गुजरातमधील सरदार सरोवराला तडे गेले असून धरण वाचविण्यासाठी, धरणातील जलस्तर कमी करण्याचे गुजरात सरकारने ठरवले आहे. जलस्तर कमी केल्यानंतर धरणाच्या बुडाशी मजबुतीकरण करावे लागणार आहे. त्या द्रूष्टीने गुजरात सरकारने पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील जलस्तर पुर्वी जो १३८ मीटर होता तो ११३ ते ११५ मीटर वर आला आहे. याचे वाईट परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.
या सर्व परीणामांची पुर्वकल्पना राज्य सरकारला देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर मुंबईत आल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून देणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मॅक्स महाराष्ट्र सोबत शुक्रवार (२० ऑगस्ट) ला बातचीत केली.