मरणाचा गुजरात पॅटर्न

Update: 2021-04-15 02:00 GMT

सध्या देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना वाढल्यानं लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होमटाऊन असलेल्या गुजरातमध्ये नक्की काय परिस्थिती आहे. 'विकासाचं गुजरात मॉडेल' असं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये अत्यंत वाईट स्थिती असून लोकांना बेड मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

१३ एप्रिलला आज तक या हिंदी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार

गुजरातची राजधानी अहमदाबाद येथील सर्वात मोठं हॉस्पिटल असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व 1200 बेड्स फुल झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना गेटवरच ठेवण्यात आलं आहे. त्यांना आत घेतलं जात नाही. विशेष म्हणजे काही रुग्णांवर अम्बुलंसमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना अम्बुलंसमध्येच ऑक्सीजन दिला जातोय… 

पाहा हा व्हिडीओ

सौजन्य आज तक

Gujarat: अस्पताल के बाहर एंबुलेंस की लंबी कतारें, ऑक्सीजन लगाकर भर्ती के इंतजार में मरीज!


Full View



HW चॅनेलने ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या शो मध्ये १ मिनिट ४० सेकंदाच्या पुढील व्हिडीओमध्ये लोक आपल्या कुटुंबाचे अत्यसंस्कार करण्यासाठी ३-३ तास वाट पाहत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू होत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Full View

इतकंच नाही तर गुजरातमधील सुरतमध्ये ४० लोक आपल्या नातेवाईकांचे अंतिम संस्कार करण्यासाठी ३ ते ४ तास वाट पाहात असल्याचं दैनिक भास्कर सारख्या जबाबदार माध्यमातून देण्यात आलं आहे.


गुजरातमध्ये प्रत्येक तासाला ३ लोकांचा मृत्यू होत असल्याचा रिपोर्ट झी न्यूज़ या वृत्त वाहिनीने दिला आहे.

गुजरात: हर घंटे कोरोना से 3 लोगों की मौत, अहमदाबाद में 2282 नए मामले बीते 24 घंटे में




कोरोनाच्या या परिस्थितीवर गुजरात उच्च न्यायालयाने देखील भाष्य केलं आहे. राज्य सरकार गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याची ठपकाही कोर्टाने ठेवला आहे. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये हॉस्पिटल्सबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधीत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही प्रतिक्षा करावी लागत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेस आणि टाईम्स ऑफ इंडियासाऱख्या वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांचीही दखल हायकोर्टाने घेत राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. तसेच माध्यमं चुकीची माहिती देणार नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटले.


नवभारत टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.




इतकंच नाही तर गुजरातमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं गुजरातमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला. तर आठ शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या संदर्भात झी न्यूज ने वृत्त दिलं आहे.

कोरोना विस्फोट के चलते गुजरात के 8 महानगरों के साथ 20 शहरों में नाइट कर्फ्यू लागू





एकंदरित विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार गुजरातची आरोग्य व्यवस्था देखील पुर्णपणे तुटल्याचं दिसून आलं आहे.

Tags:    

Similar News