अमरावती जिल्ह्यातील मोथा- बासलापूर वनातील तलावाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जलपूजन

Update: 2021-10-15 11:33 GMT

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मोथा बसलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज केले.मोथा बासलापूरच्या हिरव्यागार जंगलात या सुंदर तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

आज विजयादशमीच्या मुहूर्तावर मान्यवर, वनप्रेमी, नागरिक यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी टाळ-मृदंगाच्या निनादात वन प्रवेशद्वारापासून जलपूजन स्थळापर्यंत वनफेरी काढण्यात आली. तलावामुळे जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय होऊन त्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबेल. वना नजिकच्या शेती क्षेत्रातही भूजलपातळी सुधारण्यास या तलावामुळे मदत होणार आहे. वनाचे पर्यावरण सुधारण्याबरोबरच पर्यटकांसाठी हे स्थळ महत्वाचा आकर्षणबिंदू ठरेल. जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News