पालघरच्या बालमृत्यूमुळे महाराष्ट्र हादरला असताना पालकमंत्री मात्र पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात गुंग असल्याची बातमी मॅक्स महाराष्ट्र ने दिल्यानंतर खडबडून जागे झालेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण बालमृत्यू प्रकरणी पीडित कुटूंबाचे करणार सांत्वन उद्या करणार आहेत.
तालुका आणि कुपोषण हे समीकरण काही केल्या संपत नसल्याचेच आता समोर येत असून तालुक्यातील सावर्डे या ठीकाणी काहि दिवसांपूर्वीच अवघ्या १० दिवसांच्या आत २ बालकांचा मृत्यू झाला यावेळी सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली यावेळी जिप अध्यक्ष प्रकाश निकम याभागाचे आमदार सुनिल भुसारा,समाजकल्याण सभापती रोहिणी शेलार खासदार राजेंद्र गावीत या सर्वांनी या घटनेची दखल घेवून या पिडीत कुटुंबाची भेट घेतली.मात्र याभागाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मात्र या घटनेकडे अक्षरशःपाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले यावेळी पालकमंत्र्यांना टीकेचे धनी देखील व्हावे लागले यानंतर पालकमंत्री रविवारी 22तारखेला सकाळी 8:30 वाजता घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटूंबाचे सांत्वन करणार आहे
मोखाड्यातील अतिदुर्गम सावर्डे गावातील अंगणवाडीतील दुर्गा कल्पेश निंबारे (११ महिने) ही मुलगी सतत आजारी असायची. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंबर महिन्यात ऊपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दुर्गाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तर रोजगारासाठी भिवंडी तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या रेणुका मुकणे (३ महिने) या कुपोषित बालिकेचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसाच्या अंतरात सावर्डे येथील अंगणवाडी क्षेत्रातील दोन बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे पालकमंत्र्यांनकडून बालमृत्यू कुपोषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात अधिकाऱ्यांना काय आदेश सूचना दिल्या जातात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.