ब्रिटीशकालीन मोठा पुल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार...

धुळे शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मोठा पुल लवकरच खुला करण्यात येणार आहे. तीन महिन्यापूर्वी हा पुल १०० वर्ष जुना असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी आणि शहरवासीयांची गैरसोय टाळण्यासाठी हा मोठा पुल खुला होणार आहे.

Update: 2023-02-14 11:09 GMT

धुळे शहरातील ब्रिटिशांनी देशातील दक्षिण व उत्तर बाजूचा व्यापार व दळणवळण वाढावे यासाठी १८८९ साली मोठ्या पुलाची निर्मिती केली होती. अनेक वर्षापासून मोठापुल धुळे शहर व देवपूर वासीयांच्या सेवेत कार्यरत होता. मात्र ह्याच मोठ्या पुलाची मुदत १०० वर्ष पुर्ण झाल्यामुळे समाप्त झालेली आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपुर्वी मोठापुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मोठापुल बंद केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहरवासीयांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या पुलावरून दुचाकी-रिक्षा-कार व इतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत धुळे शहराचे आमदार डॉ.फारुख शाह यांनी पाहणी केली. त्यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकेट लावण्यात यावे आणि येत्या दोन दिवसात दुचाकी-रिक्षा-कार व इतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. फारुख शाह यांनी केली आहे. या पाहणी दौऱ्यात आ.फारुख शाह यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे आणि नगरसेवक नासिर पठाण, दीपश्री नाईक,नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक मुक्तार अन्सारी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या दोन दिवसात हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. फारुख शाह यांनी दिली.

Tags:    

Similar News