आज अंतरवली सराटी याठिकाणी मराठा समाजाची ओबीसी OBCआरक्षणासंदर्भात सभेच आयोजन करण्यात आलं. कमीकत कमी २५० एक्कर जागेत या सभेच आयोजन करण्यात आलं आहे. तिन दिवसापासून या सभेजी जोरदार तयारी सुरू आहे. तेवढ्याच मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील सभेठिकाणी देण्यात आला आहे.
दरम्यान शुक्रवारपासूनच या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी दिसून आली आहे. अनेकजण रात्री या सभेस्थळी पोहचले असून आज ११ वाजता मनोज जरांगे पाटील हे सभेस्थळी मराठा समाजाला ओबीसी OBC आरक्षणासंदर्भात संबोधित करणार आहेत.
मराठा OBC आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमर उपोषण केलं होतं. दरम्यान या आंदोलन काहींनी चिगळण्याचा देखील प्रयत्न केला केला होता. अनेकांवर पोलिसांमार्फत लाठीचार्ज झाला परंतु हार न मानत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरूच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी सरकार सरकारला १० दिवसाचा अवधी दिला होता. याकाळात त्यांनी सपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन अनेक सभा घेतल्या मराठा समाजाच्या एकसंघ करत आज अंतरवली सराटीत पुन्हा एकदा भव्य सभेच आयोजन करण्यात आलं आहे.