गेल्या काही काळा पासुन सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव तर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ ईगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल डिझेल गॅस ची सतत होणारी दरवाढ, शेतमालाचा योग्य हमीभाव, पिक विम्याच्या पैशांचा त्वरित परतावा, खरीप हंगामाच्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करून देण्यात यावी, शेतकऱ्यांचे कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईगतपुरीमधील सुगत बुद्धीविहार ते इगतपुरी तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तहसिल कार्यालयावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात सहभागी जमावाकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली.