शिवसेना आमदाराच्या वादग्रस्त विधानानंतर ग्रामसेवक आक्रमक; राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संपावर
शिवसेना आमदारांनी ग्रामसेवकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद येथील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काल ग्रामसेवकांना भामटे म्हटले होते, त्यानंतर आता ग्रामसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
औरंगाबाद येथे सोमवारी महिला सरपंच मेळावा पार पडला यावेळी भाषण करताना सरपंच यांनी ग्रामसेवकांपासून सावध राहावं, कारण ग्रामसेवक भामटा असतो, असं विधान शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या याच विधानाला आता ग्रामसेवक संघटनांकडून विरोध होत असून राज्यातील ग्रामसेवक आक्रमक झाले आहेत. तर शिरसाठ यांनी आपल्या विधानाबद्दल बिनशर्त पणे माफी मागावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनांनी केली आहे.
शिरसाठ यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांनी मध्ये संतापाची लाट आहे.त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय येथे ग्रामसेवक संघटनेकडून निदर्शने करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे.
सरकारची अडचणी वाढणार?
आधीच राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सरकार हतबल झाला आहे. त्यातच आता ग्रामसेवक संघटनांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.