राज्यपालांचा पुन्हा संकेतभंग : ब्राह्मण पुरुषांना वेद शिकविणाऱ्या संस्थेला दिली २० लाखाची देणगी

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची एक वर्षाची टर्म पूर्ण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसोबत त्यांचे सातत्याने खटके उडत असताना आता पुण्यातील कोथरुड येथील वेदभवन या फक्त ब्राह्मण पुरुषांना वेद शिकविणाऱ्या संस्थेला २० लाखांची देणगी जाहीर करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. याबाबत समाजमाध्यमांमधे पोस्ट व्हायरल झाली आहे.....

Update: 2020-11-22 12:17 GMT

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यातील कोथरुड येथील वेद भवन या फक्त ब्राह्मण पुरुषांना वेद शिकविणाऱ्या संस्थेला २० लाखांची देणगी जाहीर केली आहे. वेद भवन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालपदावरील घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा या कृतीचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. राज्यपालांना राज्य सरकारच्या बजेटमधून निधी दिला जातो. तो कसा खर्चा करावा हा त्यांचा अधिकार असला तरी भाजपच्या एका आमदाराला खुष करण्यासाठी कट्टर जातीय आणि ब्राह्मणी वर्चस्वाचे प्रतिमान मानल्या गेलेल्या वेदभवनाला देणगी देऊन राज्यपालांनी आपल्यातील जात्यंध संघ स्वयंसेवकाचे प्रदर्शन केले आहे.

वेद भवन ही संस्था फक्त ब्राह्मण पुरुषांना वेद शिकविण्याचे काम करते. हिंदु धर्मातील ब्राम्हणेतर म्हणजे शूद्रांना आणि स्त्रियांना वेद पठणाचा या ठिकाणी अधिकार नाही. या संस्थेचा कार्यक्रम मनुस्मृती या ग्रंथावर आधारित आहे. वेदांच्या नावाखाली येथे सनातन वैदिक धर्मविचार शिकविला जातो. जो व्यवहारात पुरोहित वर्गाच्या हातातील शोषणाचे यंत्र बनतो.


महाराष्ट्रात सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या माता-पित्याला धर्माच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त केले होते. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या भावंडाचा छळ केला होता. संत तुकारामांची हत्या केली होती. वेदांवर अधिकार सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला गेला. शाहू महाराजांना छळले. इतके की टिळकांसारखा पुढारी त्यांच्या मागे लावला. अशा या महाराष्ट्रात सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राज्यपाल वेदभवनाला देणगी जाहीर करतात, हे भयसुचक आहे. हा जात्यंध आणि धर्मांध माणूस घटनात्मक पदावर बसण्याच्या लायकीचा नाही, हे गेल्या वर्षभरात वारंवार सिद्ध झाले आहे. या घटनेने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

15 ऑगस्ट 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे येथील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेला (वेदभवन) भेट दिली..




Tags:    

Similar News