राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन
राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती;
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्य, देश व जगभरातील अनुयायी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी इथं दाखल झालेत. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर देखील अभिवादन करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांनी चैत्यभूमीवर येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.