शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेम व सेवाभावाने कार्य करावे : राज्यपाल

पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा भायंदर आणि भिवंडी येथील शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा 'कोविड संजीवनी पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला.;

Update: 2021-07-31 06:43 GMT

मुंबई : मातृत्वभाव म्हणजे वात्सल्य व प्रेमभावना आणि ही भावना केवळ महिलांकडेच असते असं नाही तर ती प्रत्येकामध्ये असते. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम केवळ नोकरी म्हणून न करता त्यात मातृत्वभाव आणि सेवाभाव जागवून केलं पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा भायंदर आणि भिवंडी येथील शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा 'कोविड संजीवनी पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 15 शासकीय अधिकारी व समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली आहे. याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले. आधीच कोरोना माणसांची परीक्षा घेत असतांना पुन्हा अतिवृष्टीचे संकट आहे. कोरोना काळात पोलीस शिपायापासून ते महासंचालाकांपर्यंत आणि पटवाऱ्यापासून ते सचिवांपर्यंत सर्वांनी चांगले काम केले .या संकटकाळात सर्वांनी मतभेत बाजूला ठेवून देशासाठी , समाजासाठी काम केले असेच काम पुढील काळात देखील केले जाईल अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

दरम्यान यावेळी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू व संपादिका निर्भीड लेख रूपा कांतीलाल कडू यांच्या कार्याचे कौतुक करतांना समितीने आपले नाव 'पनवेल सहयोग समिती' असे करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. कांतीलाल कडू यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. लहाने यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या अनुपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त, डॉ गिरीशजी गुणे, मुख्य विश्वस्त गुणे हॉस्पीटल,पनवेल, सुधाकर देशमुख, आयुक्त भिवंडी महापालिका, डॉ प्रशांत रसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण डोबिंवली स्मार्ट सिटी, सुजाता दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका, दत्तात्रेय नवले, प्रांताधिकारी, पनवेल विभाग, विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल, संजय शिंदे, उपायुक्त, मिरा भाईंदर महापालिका, शशिकांत तिरसे, कळंबोली प्रादेश‍िक परिवहन मोटार निरीक्षक, डॉ सच‍िन संकपाल, मुख्य अधिष्ठाता उपजिल्हा रुग्णालय पनवेल, डॉ प्रमोद पाटील, पनवेल उपजिल्हा रुग्णालयचे वैदयकीय अधिकारी, डॉ अर्चना राम थडानी, सामाजिक वैदयकिय तज्ञ व स्मिता गवाणकर, सूत्रसंचालक व वृत्तनिवेदिका यांना कोविड संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags:    

Similar News