सोनिया गांधींच्या त्या पत्रावरुन गोपीचंद पडळकर यांचा टोला

facebooktwitter-greylinkedin
Update: 2020-12-19 12:30 GMT
सोनिया गांधींच्या त्या पत्रावरुन गोपीचंद पडळकर यांचा टोला
  • whatsapp icon

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एससी आणि एसटी जातींसाठी अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. पण यावरुन आता गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. "हे महाविकास आघाडीचं सरकार दलित,आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा.सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.


Full View
Tags:    

Similar News