गुगलने देखील वाहिली राणी एलिजाबेथ द्वितीय यांना श्रध्दांजली...

Update: 2022-09-11 08:59 GMT

नेहमी आपल्या ब्राउजर वर काहीना काही थीम ठेवणाऱ्या गुगल ने देखील आज रविवारी दुखवटा पाळला आहे. ब्रिटेनची राणी एलिजाबेथ द्वितीय यांना श्रध्दांजली म्हणून गुगलने इतिहासात पहिल्यांदाच गुगलचं डुडल हे कृष्णधवल स्वरूपात ठेवलं आहे.

८ सप्टेंबर २०२२ ला ब्रिटेनची राणी एलिजाबेथ द्वितीय ज्यांनी आजपर्यंतच्या ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक ७० वर्षांहुन अधिक काळ राज्य केलं. त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांना वयाच्या ७३ व्या वर्षी ब्रिटनची सत्ता मिळाली आणि ते राजे झाले आहेत. त्यांनी ठरवल्यानुसार ११ सप्टेंबर रोजी रविवारी राणीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. जगातील काही मोजक्या प्रसिध्द आणि सन्माननीय व्यक्तींपैकी एक राणी एलिजाबेथ द्वितीय होत्या.

त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे त्या निमित्ताने राष्ट्रध्वज देखील अर्ध्यावर आणला आहे. भारत हा ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला असल्याने भारत आणि इंग्लंडचे रूणानुबंध कायम आहेत. त्यामुळे भारतात तरी गुगल इंडीयाने राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आपला लोगो कृष्णधवल स्वरूपात ठेवुन राणीच्या प्रती आपल्या संवेदवना व्यक्त केल्या आहेत.

Tags:    

Similar News