साकारतोय महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण

महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून संबोधले जाणाऱ्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या नाशिक-पुणे-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वेबद्दल आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांच्या या विशेष रिपोर्टमधून...;

Update: 2021-05-26 11:09 GMT

पुणे आणि नाशिक शहरांमध्ये अलिकडच्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. या शहराला व्यापारी- व्यावसायिक दृष्ट्या प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे आणि या वृद्धीबरोबरच पुणे - नाशिक मार्गावर लोक आणि वस्तूंच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक येथून पुणे- मुंबईकडे मोठ्याप्रमाणात तरकरी वाहतूक केली जाते. त्यामुळे ही वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून पुणे - नाशिक रेल्वेची मागणी होत होती.

235 किमी च्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिले महत्वाचे पाऊल म्हणजे क्षेत्र मोजणीला सुरवात झाली असून, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील पठार भागात अधिकाऱ्यांनी मोजणी केली.

हायस्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर तालुक्यात भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी मोजणीला सोमवार (दि.24) महारेल, महसूल, भूमि अभिलेख, वन व कृषी विभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्यात पठार भागातील सात गावांमध्ये मोजणी केली जाणार असून, संगमनेर तालुक्यातील जमिनीपैकी पहिल्या टप्यात जांबुत बुद्रुक, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, येलखोपवाडी, माळवाडी, आकलापूर, केळेवाडी गावांमधील जमिनी मोजल्या जाणार गेल्या.तर मंगळवारी (दि 25)  खंदरमाळवाडी तर बुधवार (दि 26) व गुरुवार (दि 27 ) ला नांदूर खंदरमाळ गावामध्ये जमीन मोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. यावेळी

महारेलचे अधिकारी सोमनाथ गुंजाळ अधिक माहिती देताना म्हणाले की, एकशे सहा गावांतून हायस्पीड रेल्वे मार्ग जात आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली आहे. खंदरमाळवाडी येथे संयुक्त मोजणी सुरू आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांचे किती क्षेत्र जाणार हे निश्चित होणार आहे.  जागेची मोजणी झाल्यावर दर निश्चित केले जाणार आहे. यासाठी गेल्या तीन वर्षाचा खरेदी विक्री व्यवहार व त्यानुसार खुल्या बाजाराचा दर व त्यानुसार जास्तीत जास्त दार निश्चित केला जाणार आहे. अशी माहिती दिली.

मुंबई, पुणे आणि नाशिक यांना एकत्रितपणे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून संबोधले जाते जिथे सामाजिक-आर्थिक विकासाची गती अतिशय वेगवान आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यातील या महत्वाच्या शहरांमध्ये थेट संबंध नाही. मात्र या रेल्वे मार्गामुळे ही शहरे थेट जोडली जाणार असल्याने या शहरांतील परस्पर व्यापाराला अधिक चालना मिळू शकते.

नाशिक- पुणे रेल्वे मार्गाची ठळक वैशिष्ट्ये

लांबी: 235.15 किमी

वेग क्षमता: 200 केएमपीएच सह अर्ध उच्च गती

स्थानक प्रस्तावितः 24

बोगदे: 18

प्रकल्पाची किंमतः साधारण 16,039 / - कोटी




 


महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (माहेरिल)

महाराष्ट्राच्या रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.

महाराष्ट्र सरकार आणि रेलवे मंत्री यांचे संयुक्त उद्यम

नेव्हिगेशन टॉगल करा

मुख्यपृष्ठ प्रकल्प पुणे नाशिक

पुणे नाशिक सेमी-हाय स्पीड रेल्वे मार्ग

पुणे आणि नाशिक शहरांमध्ये अलिकडच्या वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे आणि या वृद्धीबरोबरच पुणे - नाशिक मार्गावर लोक आणि वस्तूंच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक यांना एकत्रितपणे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून संबोधले जाते जिथे सामाजिक-आर्थिक विकासाची गती अतिशय वेगवान आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यातील या महत्वाच्या शहरांमध्ये थेट संबंध नाही. नवीन प्रस्तावामुळे केवळ जास्त गाड्या येण्याची शक्यता आहे परंतु त्याच वेळी वेगवान प्रवासामुळे अधिकाधिक प्रवासीही या मार्गाकडे आकर्षित होतील. हे पट्ट्यावरील औद्योगिक कॉरिडॉरचे उत्प्रेरक म्हणून काम करेल, यामुळे या प्रदेशाला अधिक उत्पन्न मिळेल.

हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन मुख्य जिल्ह्यांमधून जाईल. हा देशातील पहिला कमी किमतीचा सेमी-हाय स्पीड कॉरिडोरही असेल. हे कदाचित भारतातील पहिलेच उदाहरण असेल ज्यात विद्युतीकरणासह दोन्ही रेषांचे एकाच वेळी बांधकाम प्रस्तावित आहे. पुणे व नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर अशा अखंड कनेक्टिव्हिटी या रेल्वे मार्गामुळे साधता येणार आहे. रेल्वे कॉरिडॉर बाजूने कंटेनर डेपोचा विकास देखील होईल.

सोबतच रेल्वेने मालवाहतूक वेगवान केल्यामुळे आर्थिक विकास साधला जाईल. शिवाय रेल्वेमार्गाद्वारे मालवाहतूक वेगवान वाहतुकीद्वारे उद्योगांसाठी हा नवीन महसूल प्रवाह देखील उघडेल. या मार्गामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाच्या वाहतुकीसाठी कनेक्टिव्हिटी प्रदान होण्यास मदत होईल. सोबतच हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे विभागातून देशाच्या विविध भागात तसेच बंदरांपर्यंत औद्योगिक वस्तूंची आर्थिक वाहतूक सुलभ होणार आहे त्यामुळे महारेलच्या प्रकल्पामुळे मार्गातील छोटं-छोट्या शेतकऱ्यांपासून ते एमआयडीसी तील मोठं मोठ्या उद्योगांना याचा फायदा होणार आहे.

Full View

Tags:    

Similar News