#Maharashtrarain : गोदावरीला रौद्ररुप, स्मशानभूमी पाण्याखाली

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-08 12:07 GMT
#Maharashtrarain : गोदावरीला रौद्ररुप, स्मशानभूमी पाण्याखाली
  • whatsapp icon

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. या पुरामुळे आजपासचा बराचसा भाग पाण्याखाली गेलेला आहे. नांदेडमध्ये माणसाला जिथे शेवटचा निरोप दिला जातो , ते अंत्यसंस्काराचे ठिकाण देखील पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

नांदेड शहराच्या मध्यभागी असलेला शांतिधाम गोवर्धन घाट परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय.

येथे काम करणाऱ्या व्यवस्थापक नरसिंग गायकवाड यांचे घर पाण्यात वाहून गेलंय, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचेही घर वाहून गेले आणि जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदुरकर यांनी

Tags:    

Similar News