बकरी ईद निमित्त बोकडाचे भाव वाढले; बकरा बाजारात गर्दी

Update: 2023-06-28 09:09 GMT

ईद-उल- आजहा अर्थात बकरी ईद उद्या साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरासोबत इतर शहरात बकरा बाजार भरवण्यात आले आहे. त्यानिमित्ताने अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले असून ठिकठिकाणी बकरा बाजार सजले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व गुजरात सह विविध राज्यातून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे. सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अशा अनेक प्रजातीचे बोकड बाजारात विक्रीसाठी आले आहे.बकरी ईद मुळे बोकड साधारणत 15 ते 35 हजार रुपयापर्यंत विकले जात आहेत.

बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची मुस्लिम समाजात परंपरा आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी या काळात बकरा बाजारत लाखो रुपयांची उलाढाल होत. असल्याचे पाहायला मिळते. नाशिक शहरात देखील देशभराच्या विविध राज्यातून बकऱ्यांची आवक झाली आहे. नाशिकच्या बाजार समितीत बकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बकऱ्यांच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आलेल्या विक्रेत्यांनी दिली आहे .

Full View

Tags:    

Similar News