दिव्यांग व्यक्तींच्या कोरोना लसीकरण, उपचार, टेस्टींगला प्राधान्य द्या, सामाजिक न्याय विभागाचं आरोग्य विभागाला पत्र

Update: 2021-05-04 03:35 GMT

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. तिथं दिव्यांगाचे काय हाल होत असतील ही बाब लक्षात घेता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरण, उपचार टेस्टींगला प्राधान्य द्या अशी विनंती केली आहे. काय आहे मागणी

दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरण, उपचार टेस्टींगला प्राधान्य देण्यात यावे. कारण दिव्यांग व्यक्तींची प्रतिकारक क्षमता इतर व्यक्तींच्यातुलनेत कमी असते. तसंच सध्याच्या काळात दिव्यांग व्यक्तींना प्रवासाला, रांगेत उभं राहण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींना कोरोना लसीकरण, उपचार टेस्टींगला प्राधान्य द्यावी अशी विनंती केली आहे.



 


Tags:    

Similar News