'शेती मालाला योग्य भाव द्या' या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काढला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर रुम्हण मोर्चा.

Update: 2024-01-09 11:46 GMT

भोकरदन तालुक्यातील शेकडो शेतकरी झाले मोर्चात सामील

 भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लोक जागर अभियान,स्वराज संघटना, बळीराजा फाउंडेशन व तालुक्यातील व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने शेतीमालाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी रूमनं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडोच्या संख्येने शेतकरी सामील होत झाले. त्याच पार्श्वभूमीवर आज साडेअकरा वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चास सुरू झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शेतीमालाला योग्य भाव द्याव्या या मागणी संदर्भात विभागीय अधिकारी भोकरदन यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. शेतीमालाला योग्य भाव द्या अशी मागणी केली त्यामध्ये सोयाबीन,मक्का,तूर,कापूस यांना योग्य प्रकारे भाव सरकारने द्यावा व शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून रोखावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

Tags:    

Similar News