एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर गिरिश महाजन यांची टीका

Update: 2021-04-28 12:37 GMT

एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोन संवादानंतर आज प्रथमच गिरीश महाजन यांनी खडसेंना चांगलंच फटकारले आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन...

एकनाथ खडसेंना उच्च पदाची अपेक्षा असताना आमदारकी ही मिळाली नाही. वाढतं वय, आजारपण यामुळे बिचाऱ्या खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. अशी खोचक टीका खडसेंवर गिरीश महाजन यांनी केली आहे.

महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका गावात पाणी येत नसल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने एकनाथ खडसेंना फोन वर केली. फोन वरील संभाषणात खडसेंनी तुमचा आमदार मेला का, पोरींचेच फोन उचलतो, बायकांमागे फिरतो अशी टीका केली होती. ते संभाषण प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाजन यांनी खडसेंना उत्तर दिलं आहे.

Full View

Tags:    

Similar News