देशातील महागाई कमी होवो, भाजप खासदारांना आशा

देशात वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच देशातील महागाई कमी होण्याची आशा भाजप खासदारांनी व्यक्त केली.;

Update: 2022-04-02 07:11 GMT

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे देशातील महागाई कमी होवो, अशी आशा खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. दिल्ली मध्ये देखील मराठी माणूस मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजर करत आहे. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बहुतांश खासदार दिल्लीत आहेत.

महाराष्ट्रातील खासदार देखील सध्या दिल्लीत असल्याने दिल्लीत गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गिरीश बापट म्हणाले, आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा होतोय. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे की, सध्या देशाची परिस्थिती आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणारा भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतं. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे.

c

Tags:    

Similar News