ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जर्मनीने चौथ्या कोविड बूस्टर डोसची केली घोषणा

ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली असताना आता ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस प्रभावी आहे का किंवा बूस्टर डोस घ्यावा असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर आता या वाढत्या धोक्यामुळे जर्मनीने चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे.;

Update: 2021-12-24 03:35 GMT

मुंबई// ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली असताना आता ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस प्रभावी आहे का किंवा बूस्टर डोस घ्यावा असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर आता या वाढत्या धोक्यामुळे जर्मनीने चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे.

तर दुसरीकडे ब्रिटन चौथ्या डोसचाही विचार करत आहेत. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल.

तर जर्मनीने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लाखो नवीन डोस खरेदीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

आरोग्य मंत्री लॉटरबॅक म्हणाले की, मॉडर्नाची कोविड लस सध्या बूस्टर मोहिमेत वापरली जाते आणि जर्मनीने नवीन नोव्हाव्हॅक्स जॅबचे 4 दशलक्ष डोस आणि नवीन व्हॅलनेवा शॉटचे 1.1 कोटी डोस ऑर्डर केलेत, जे मार्केटिंग ऑथोरिटीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान omicron मुळे अनेक देशातील आरोग्य यंत्रणावर ताण येण्याची शक्यता लक्षात घेता , सर्वच देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

Tags:    

Similar News