गौरी लंकेश,डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकरच्या शिवसेना प्रवेशाला स्थगिती
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात न्यायालयाकडून पुराव्या अभावी मुक्तता झालेला तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी असलेला जालन्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी खोतकर यांनी त्याला शिवसेनेत प्रवेश दिला होता.नालासोपारा येथील शस्त्र साठा प्रकरणी रसद पुरवल्याचाही पांगारकरवर आरोप होता.जालन्यातील खुशालसिंग ठाकूर यांच्या रेवगाव येथील फार्म हाऊसवर मराठवाड्यातील चार तरुणांना पांगारकर याने बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात एटीएसने पांगारकरला सात वर्षांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयाने काही दिवसापूर्वीच पुराव्या अभावी पांगारकरची निर्दोष मुक्तता केली होती.. पांगरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जालना विधानसभा प्रमुख म्हणून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली होती.
गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावर टिका होऊ लागल्यावर पक्षाने पत्र काढून या प्रवेशाला स्थगिती दिली आहे.