गणपती उत्सव तोंडावर आला असून मुर्ती बनविणारे कलाकारांची एकच लगबग दिसून येत आहे. त्यातच कोरोनाच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांना अत्यंत हलकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु, यावर्षी वातावरण नियंत्रित असल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
परदेशी ताई गेल्या 15 वर्षापासून गणपती मूर्ती, मातीचे बैल बनविणे, दुर्गा देवी मूर्ती, लक्ष्मीपूजन, मडकी, गाडगे, पणती असे विविध प्रकारचे सर्व मातीचे वस्तू बनवण्याचे कलाकृतीचे काम करतात. या व्यवसायावर त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह चालत असल्याने सर्व कुटुंबातील सदस्य हे काम अतिशय उत्कष्टपणे करतात.
यावर्षी गणपती महोत्सवासाठी त्यांनी गणपती मूर्ती तयार केले आहेत. दोन दिवस गणपतीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवीत आहे असे परदेशी ताई यांनी सांगितले कान,नाक, डोळे बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देताना एक मूर्ती किमान सतरा वेळा हाताळावी. लागते तेव्हा ती पूर्णपणे तयार होते. त्यासाठी खर्चही खूप येतो. सध्या सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले आहे त्यामुळे खर्च काढून समाधानकारक पैसे मिळत नाही. यावर्षी चांगल्या प्रकारे मूर्तीची विक्री होईल व बऱ्यापैकी फायदा होईल सध्या दुकानांमध्ये शाडु मातीचे गणपती व विविध गणपती रूपातल्या मूर्ती दिलेल्या आहे.असे मत मुर्तीकार सोनु परदेशी यांनी व्यक्त केले.