नांदेडमध्ये गँगवॉर, भर संध्याकाळी एका तरुणाचा रस्त्यात खून

Update: 2021-07-21 02:27 GMT

नांदेड : नांदेड शहरात भर संध्याकाळी रस्त्यात एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हा गँगवॉरचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील जुन्या नांदेड भागातील गाडीपुरा येथे काही युवकांनी गोळीबार करून विक्की ठाकूर नावाच्या तरुणावर गोळीबार केला आहे. संध्याकाळी 7 वाजता हा प्रकार घडला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीपुरा भागात रेणुकामाता मंदिर परिसरातील एका गल्लीतून विक्की ठाकूर हा तरुण जात होता. पण तेव्हाच भर रस्त्यावरच विक्की ठाकूर याच्या बाईकवरुन आलेल्या सहा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात विक्कीच्या डोक्याला एक गोळी लागली आणि तो खाली कोसळला. पण त्यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्या शरीरावर तलवारीने सपासप वार केले. तो मेल्याची खात्री पटल्यावरच गुंड पसार झाले. ही घटना गँगवारमधून घडल्याची माहिती समोर आली आहे. खून झालेला विक्की ठाकूर हा देखील गुंड होता आणि शहरातील विविध पोलीस स्थानकात त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

नांदेडमध्ये वर्षभरापूर्वी विक्की चव्हाण नानाच्या गुंडाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा साथीदार विक्की ठाकूर याचाही आता खून करण्यात आलाय. त्यामुळे या गॅंगवॉरच्या टनेने शहरात दहशत पसरली आहे.

Tags:    

Similar News