गणेश चित्र कार्यशाळेत लगबग सुरू; कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे मूर्तिचे दर वाढणार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश चित्र कार्यशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. परंतु सध्या मूर्तीसाठी लागणारी कच्ची सामग्री, कलर, शाडूची माती यांचे भाव वर्षानुवर्षे वाढत असल्याने मूर्तिकारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे मूर्तींच्याही किंमती वाढल्यावल्या जाणार असल्याचे मूर्तिकलारांकडून सांगितले जात आहे.