जर्मनीमध्ये गणपती बाप्पा मोरया !

Update: 2021-09-20 05:39 GMT

गणेशोत्सव गेल्या काही वर्षात ग्लोबल झाला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त विविध देशांमध्ये गेलेले भारतीय नागरिक त्या त्या ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. असाच गणेशोत्सव दिमाखदारपणे जर्मनीतील बर्लिनमध्येही साजरा केला गेला. "गणपती बाप्पा मोरया" या जयघोषाने बर्लिनमधील हरमानप्लाट्झ परिसर दुमदूमून गेला होता. या सोहळ्यासाठी बर्लिनमधील शेकडो भारतीय नागरिक, जर्मन आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायातील लोकही उपस्थित होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा गणेशोत्सव साजरा केला गेला.



 

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मित्र बर्लिन (MMB) गणेशोत्सवा मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या ठिकाणी जागतिक शांतता नांदावी, कोरोनाचे संकट लवकर जावे आणि भारत-जर्मनी या दोन्ही देशांची भरभराट व्हावी या उद्देशाने गणपती बाप्पांना Invoking Ganesha for Peace and Prosperity या संकल्पनेद्वारे साकडे घातले गेल्याचे मराठी मित्र बर्लिन तर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बर्लिनमधील गणेश मंदीर आणि रमणबाग युवामंच यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सोहळ्याला बर्लिनमधील अनेक सरकारी अधिकारी, राजकारणी, बर्लिनमधील भारतीय दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भारतीय दूतावासाचे मोहित यादव, द टागोर सेंटरच्या संचालिका मालती राव वडापल्ली, तेथील जिल्हा महापौर मार्टिन हिकल, ग्रीन पार्टीचे आमदार डॉ काहलेफेल्ड यांच्यासह इतरही काही राजकीय नेते उपस्थित होते.



यावेळी बर्लिनमधील गणेश मंदिरापासून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बाप्पांची पालखी आणि रथासमोर महाराष्ट्राच्या पारंपारिक ढोल-ताशे आणि महिलांच्या लेझीम नृत्याचा होता.

Full View

Tags:    

Similar News