मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून नव्या विकासपर्वाला सुरुवात केली. तीन वर्षात इथला नक्षलवाद संपवू अशी घोषणा फडणवीसांनी करत या जिल्ह्याला स्टीलसिटी बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे आश्वासक चित्र निर्माण झालं आहे. तरीही अनेक अडचणींवर मात करत त्यांना आपलं टास्क पूर्ण करावं लागणार आहे. तीन संपादकांनी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्याचं विश्लेषण केलं आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने, लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे आणि ज्येष्ठ पत्रकार संपादक सुभाष शिर्के यांच्याशी चर्चा केलीय.