सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार; आज दिल्लीत दाखल होणार पार्थिव

Update: 2021-12-09 02:09 GMT

तामिळनाडूच्या कुन्नूरनजीक झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं जाणार आहे. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून , सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरनजीक हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला.

Tags:    

Similar News