Budget 2023: आज मोदी सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट
जागतिक आर्थिक मंदीचे संभाव्य संकट आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारचे हा शेवटचा पुर्ण अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असतील.;
जागतिक आर्थिक मंदीचे संभाव्य संकट आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारचे हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना संयुक्त सभागृहात संबोधीत केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२-२३ वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण देखील मांडले.आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी ११ वाजता त्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर करतील.
गेल्या दोन अर्थसंकल्पा प्रमाणेच यावेळी देखील अर्थसंकल्प पेपरलेस असेल. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचा मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.जागतीक बाजारात मंदीचे वातावरण असून पुढील वर्ष निवडणुकीचे वर्ष असताना आज केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होत आहे.
अर्थसंकल्पाकडून अपेक्षा
१) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारचे शेवटचे बजेट ; महागाईने त्रासलेल्या जनतेला दिलासा; गरजेच्या गोष्टींवर कर कपात?
२) मोदी सरकारच्या कार्यकाळात एकदाही आयकर मर्यादेत वाढ नाही
३) नोकरदार वर्गाला यावेळी आयकर मर्यादेत सूट मिळेल अशी अपेक्षा
४) सध्या २.५ लाखांची आयकर मर्यादेचा स्लॅब पाहणे उत्सुकतेचे ठरेल
५) मोदी सरकार अखेरच्या पूर्ण बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती कमी करेल?
६) ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी सूट पुन्हा मिळेल ?
७) अर्थसंकल्पात गृहकर्जात काही सवलत मिळेल याची अपेक्षा असेल.
८) किसान सम्मान निधीच्या रक्कम ६ हजारावरुन ८ हजार होण्याची शक्यता
७) बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रा संदर्भात मोठी घोषणा होण्याची आशा
८) युवकांना रोजगारासंदर्भात ठोस घोषणा होण्याची आशा
९) शैक्षणीक कर्ज स्वस्त होईल का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल.
१०) या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिसाला देणाऱ्या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा