नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होणार आहे. याशिवाय वायनाड इथली जागा राहुल गांधी यांनी रिकामी केल्यामुळे तिथेही आगामी काळात पोटनिवडणूक होईल. प्रियांका गांधी स्वता तिथे पोटनिवडणूक लढवणार आहे. मात्र नांदेड मध्ये काँग्रेसला लोकसभेसाठी चेहरा मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांना दोन्ही जागा जिंकून आणाव्या लागणार आहे. त्याचमुळे त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.