Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, भारत दौऱ्यावर
26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन(Emmanuel Macron), हे उपस्थित राहणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन हे गुरुवारी 25 जानेवारी रोजी देशातल्या जयपूर विमानतळावर (Airport) दुपारी 2:30 उतरेल त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देत रात्री 8:50 दिल्लीकडे रवाना होतील.;
देशात प्रजासत्ताक( Republic Day) दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमास 26 जानेवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार असून ते राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमधून दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. गुलाबी शहर म्हणून लोकप्रीय असणाऱ्या जयपूरमधील (jaipur)प्रसिध्द असणारा आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा 'जंतर मंतर' याठिकाणी ते भेट देतील.
यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शो मध्ये जयपुर मध्ये असणार आहेत. त्यानंतर हॉटेल ताज, रामबाण पॅलेस या ठिकाणी दोन्ही नेते भारत-फ्रान्स द्वीपक्षीय संबंध आणि विविध भूराजकीय घडामोडींवर सर्व व्यापक चर्चा करतील.
फ्रान्सचे 95 सदस्यीय मार्चिंग पथक आणि 33 सदस्यीय बँड पथकही परेडमध्ये सहभागी होणार आहेत. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी रोल टँकर वाहतूक विमानही या समारंभात सहभागी होणार असून
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्याकडून आयोजित केलेल्या राष्ट्रपती भवनातील मेजवानीला इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित राहुन शुक्रवारी संध्याकाळी 07:10 वाजता मुरमु यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच रात्री10:05 वाजता ते दिल्लीहून फ्रान्सकडे रवाना होतील.