...तर महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल- सदाभाऊ खोत

Update: 2021-09-20 05:19 GMT

सांगली  :  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांंनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

सोबतच हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? असा सलाव देखील खोत यांनी विचारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार होते मात्र त्यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. दरम्यान त्यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

याआधी सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. याचबाबत ते कोल्हापूर येथे पाहणीसाठी निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांनी कराड विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत घोटाळ्यांचा पाढाच वाचला. तसंच सरकारने पोलिसांचा गैरवापर करुन माझ्याविरोधात दडपशाही केल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

Tags:    

Similar News