टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक
जगभरात सर्वत्र ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे. मुंबई देखील ख्रिश्चन बांधव नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या या कामाचे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील कौतुक केलं आहे.;
मुंबई // जगभरात सर्वत्र ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे. मुंबई देखील ख्रिश्चन बांधव नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या या कामाचे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील कौतुक केलं आहे. विराटने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहे. मुंबईतील वांद्रे परीसर, सी लिंकवर ख्रिसमस निमित्त आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. याचाच एक व्हिडीओ विराट कोहलीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Phenomenal job guys. The city looks so festive and lovely. 😍 @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/2ro89R2jTn
— Virat Kohli (@imVkohli) December 25, 2021
विराटने व्हिडीओ सोबत लिहिलं आहे की, अभूतपूर्व काम केलं आहे. शहर खूप सुंदर आणि उत्सवपूर्ण दिसत आहे. विराटने आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केल्याने राजकीय क्षेत्रात सर्वांच्या भुवया उंचावल्यात.
मुंबईत पहिल्यांदाच नाताळानिमित्त विद्यूत रोषणाई करण्यात आली.