जगण्या मरण्यापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या आहेत का?
संपूर्ण विश्वाला कोरोनाने विळखा घातला असताना भारतात दुसऱ्याला ते बरोबरच तिसऱ्या लाटेची ही भीती व्यक्त केली जात आहे. अधिकृत तीन लाखापेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने पुढील वर्षी होणार्या उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची बैठक घेतल्याने एक माजी सनदी अधिकारी चांगलाच संतापला आहे.;
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अनेक उत्तरेतील राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचे आकडे आणि मृत्यु बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात बैठक झाली असून, निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकारावर एका माजी आयएएस अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये, असा संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीपूर्वीच्या नियोजनासाठी भाजप आणि RSS मध्ये बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सहभागी झाले होते. यावरून माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी ट्विटरवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोकं जगो अथवा नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीमध्ये उशीर होता कामा नये. सध्याचे युग हे लाज सोडललेल्या सत्तेचे युग आहे, असा घणाघात सूर्य प्रताप सिंह यांनी केला आहे. या ट्विटला तीन हजारहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. तर नऊ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी करताना भाजपश्रेष्ठींचा सध्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा इरादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे विश्वासू सनदी अधिकारी ए. के. शर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शर्मा यांचा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत प्रतिष्ठा पणाला लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची फौज प्रचारात उतरू नये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी या निवडणुकीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भाजपला कोरोना संसर्गामुळे लोकांचे जाणारे जीव महत्त्वाचे आहेत की निवडणुकीचा प्रचार आणि विजय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.