महाराष्ट्र काय फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणापुरता मर्यादित आहे का? -माजी मंत्री बोंडे

Update: 2021-10-27 02:08 GMT

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी 2650 कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुरता मर्यादित आहे का? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहे,असं असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने मदतीचे आदेश काढले, मात्र पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केली नाही, त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का? असा प्रश्न माजी कृषिमंत्री बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,अनेक ठिकाणी तर थेट शेत जमीनच खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे, त्यातच वारंवार मागणी केल्यानंतर कुठेतरी शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मात्र, त्यातही विदर्भातील अनेक जिल्ह्याना त्यातून वगळण्यात आले त्यामुळे माजी कृषिमंत्री बोंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.


Tags:    

Similar News