सातारा वनविभागाची मोठी कारवाई
सातारा वनविभागाच्या धाडसत्रामधे खैर जातीच्या सोलीव लाकडाची तस्करी करणारे दोन ट्रक सापडले असून २० लाखाचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीच्या अधारे दोन एप्रिल रोजीच रात्री सापळा रचून पुणे बेंगलोर महामार्गावर खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतुक करीत असलेले 2 ट्रक ताब्यात घेवून जप्त केले आहेत . ही कारवाई वनविभागाच्या भरारी पथकास गुजरात राज्यातून व नदुंरबार जिल्ह्यातुन खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची तस्करी करणारे ट्रक चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती होती.
माहीतीच्या आधारे त्यांनी पुणे- बेंगलोर महामार्गावर मौजे अतित व मौजे लिंब येथे भरारी पथकाने सापळे रचले.ट्रक क्रमांक MH 48 AY 9010 व ट्रक क्र.MH 15 AG 7767 हे अनुक्रमे रात्री 10.00 व सकाळी 6.30 वा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये कात तयार करण्यासाठी वापरणेत येणार्या खैर प्रजातीचा सोलीव लाकूड सापडला. अधिक चौकशीअंती सदरचा लाकूडमाल हा अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. वनविभागाने दोन्ही ट्रकसह खैर लाकूडमाल इत्यादी सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद केला आहे .
गेले अनेक दिवसांपासून वनविभागाने कारवाई करण्याचे धाड सत्र चालू ठेवले आहे या पूर्वी देखील या पथकाने खैर जातीचा सोलीव लाकडाची तस्करी करणारे वाहन व मुद्देमाल जप्त केले आहे मात्र ही कारवाई होती का नाही तोपर्यंत दोन वाहनांसह खैर जातीचा मालासह वाहने वनविभागाने जप्त केली आहे.मात्र इतर राज्यातून चिपळूण या ठिकाणी खैर लाकडाची मोठी मागणी आहे. यामुळे अवैद्य रित्या मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वाहतूक चालू असल्याचे आजचा कारवाईमुळे स्पष्ट होताना दिसत आहे.मात्र अवैद्य रित्या वाहतूक करताना सापडल्यास वनविभाग कारवाईत कोणतीही कसर करणार नाही असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी सांगितले आहे.