जगातल्या गरीबांची यादी फोर्ब्स प्रसिद्ध करेल का ?

Update: 2021-04-24 09:17 GMT

भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. असं म्हटलं जातं ते खरंच आहे. कारण आता जगात अमेरिका आणि चीन नंतर भारतात सर्वाधिक अब्जाधीश राहतात. प्रतिष्ठित फोर्ब्स मॅग्झीनने एक यादी प्रकाशीत केली आहे. या यादी नुसार अमेरिकेत सर्वाधिक 724 अब्जाधीश लोक राहतात. तर चीनमध्ये 698 आणि आपल्या भारतात 140 अब्जाधीश राहतात. या अब्जाधीशांप्रमाणे सर्वात गरीब माणसांची यादी फोर्ब्सने प्रसिद्ध केली तर आपला देश कुठं असेल.


'ऑक्सफॅम इंडिया' च्या अहवालानुसार भारतातील एक टक्का धनिकांकडे देशाच्या ७० टक्के गरीब लोकसंख्येच्या (अंदाजे ९५.३ कोटी) एकूण संपत्तीच्या चौपट संपत्ती आहे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात गरीब माणूस खाण्यासाठी महाग झाला होता. देशातील 84 टक्के घरांना घरखर्च चालवण्यासाठी पैश्याची निकड जाणवली. त्यांना शेकडो किलोमीटर आपल्या पोटासाठी स्थलांतर करावं लागलं. या गरीब लोकांची दखल फोर्ब्स मॅग्झीन कधी घेणार आहे का?

फोर्ब्सने जर ही यादी प्रसिद्ध केली तर जगातल्या गरीबांच्या यादीत आपला देश कुठं असेल. याचा विचार आपण कधी करणार आहोत का?



कोरोना काळात देशातील आघाडीच्या 100 धनाढय लोकांच्या संपत्तीत तब्बल 13 लाख कोटींनी वाढ झाली. गेल्या एप्रिलमध्ये प्रत्येक तासाला 1 लाख 70 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली. मात्र, त्याच काळात भारतातील श्रीमंत लोकांची जेवढी संपत्ती कमावली. त्या संपत्तीतून देशाच्या 13 कोटी 8 लाख जनतेला प्रत्येकी 94,045 रुपयांची मदत केली जाऊ शकते. तसंच लॉकडाऊन काळात देशातील धनाढ्य लोकांनी जेवढी संपत्ती कमावली. त्या संपत्तीतून 10 वर्षे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार निर्मिती योजना किंवा आरोग्य मंत्रालयाचे कामकाज चालवले जाऊ शकते. असं या ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटलं आहे.



एकंदरींत जगातील गरीब आणि श्रीमंत दरी वाढत चालली असून या दरीवर सरकारच कल्याणकारी योजना राबवून ही दरी मिटवून शकतं. अन्यथा गरीब श्रीमंत दरी वाढतच राहणार आहे.

या गरीब श्रीमंत दरीचे उदाहरण पाहायचे असेल तर लॉकडाऊन काळात जेव्हा अनेक लोकांचे जॉब जात होते. त्याच काळात मुकेश अंबानी एका तासात करोडो रुपये कमवत होते. फक्त अंबानींचं नाही. तर देशातील अनेक उद्योगपती देखील मालामाल झाले.

रिलायंस इंडस्ट्रीज अध्यक्ष मुकेश अंबानी तर प्रतिष्ठित फोर्ब्स मॅग्झीनच्या यादीनुसार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीन च्या जैक मा ला मागे टाकले आहे. Adani Group चे अध्यक्ष आणि भारतातील दूसरे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अडाणी जगभरात २४ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 50.5 बिलियन डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे.

लॉकडाऊन काळात जेव्हा देशाचा सर्वसामान्य माणूस अन्न पाण्यासाठी झगडत होता. तेव्हा देशातील श्रीमंत व्यक्तीची संपत्ती करोडो ने वाढत होती. 

याला विकास म्हणायचं का?

 देशाची संपत्ती मुठभर लोकांच्या हाती असणं म्हणजे विकास आहे का? भारत हा ५ ट्रिलीयन डॉलरची इकॉनोमी होणार असेल तर त्या ५ ट्रिलीयन इकॉनोमीमधून इतर भारतीयांना काय मिळणार आहे? या संशोधनाचा विषय हा संशोधनाचा विषय जगाच्या श्रीमंताची यादी प्रसिद्ध करणारे प्रतिष्ठित फोर्ब्स मॅग्झीनने हातात घेऊन एकदा देशातील गरीबांची यादी प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे.

Tags:    

Similar News