धक्कादायक ! सांगली जिल्ह्यात आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळ येथील आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.;

Update: 2023-08-28 03:32 GMT

धक्कादायक ! सांगली जिल्ह्यात आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 100 पेक्षा अधिक मुलांना विषबाधा झाली आहे. तर त्यातील काही मुलांना माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याबरोबरच ज्या मुलांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा मुलांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जत तालुक्यातील उमदी येथे रविवारी एका मंगल कार्यालयात एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेले जेवण आश्रम शाळेतील मुलांसाठी देण्यात आले. जेवणानंतर काही मुलांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

समता आश्रमशाळेतील विषबाधा झालेल्या मुलांपैकी काही मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालय़ात हलवण्यात आले आहे.

जेवणानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यातच अजूनही काही मुलांना त्रास होत असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.


Tags:    

Similar News