नागपुरात सर्वत्र धुक्याची चादर, आज आणि उद्या पावसाचा इशारा
नागपूरसह परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरून आज सकाळीच्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आली आहे. व्हिजीबीलीटी कमी असल्यानं विमान उड्डानावर परिणाम झाला आहे.
नागपूर // नागपूरसह परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरून आज सकाळीच्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आली आहे. व्हिजीबीलीटी कमी असल्यानं विमान उड्डानावर परिणाम झाला आहे. आज सकाळपासूनच शहरात धुक्याची चादर असल्यानं वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
नागपुरात मागील दोन दिवसांपासून थंडी कमी झालीआहे. कमाल तापमान 14.4 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.दरम्यान नागपूरसह विदर्भात आज आणि उद्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान , शेतकरी आणि पशुपालकांनी काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे, शेळ्या मेंढ्या मोकळ्या जागेत चरावयास टाळावे. पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं केलं आहे.