Serum Institute Fire: आगीत पाच जणांचा मृत्यू

Update: 2021-01-21 12:52 GMT

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी 1:30 वाजता ही आग लागली होती. या संदर्भात माहिती देताना राज्याचे आरोग्य मंत्री यांनी माध्यमांशी बोलताना...

"जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं. मात्र, तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे" असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

देशाला कोरोनाची लस (कोव्हिशिल्ड) देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ही नवीन इमारत आहे. सीरम इन्स्टिट्यूट च्या या इमारतीत लस तयार केली जात नाही. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. ही आग मांजरी येथील इन्स्टिट्यूटला लागली असून या इमारतीच्या एका भागाला ही आग लागली होती. या आगीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

Tags:    

Similar News