नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, अखेर आरोपपत्र दाखल

गेल्या काही दिवसांपासून मनी लाँडरिंगप्रकरणी मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. मात्र अखेर नवाब मलिक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Update: 2022-04-22 03:17 GMT

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधीत मनी लाँडरिंगप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने विशेष न्यायालयात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ED ने आरोपपत्रात केलेले आरोप

  • ED ने नवाब मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर, सरदार सहावली खान आणि त्याच्या हस्तकामार्फत कुर्ला येथील गोवावाला कँप परिसरात साडेतीन एकर जमीन खरेदी केली होती. तर या प्रकरणातील पैसा मनी लाँडरिंगमार्फत अंडरवर्ल्ड पुरवल्याचा आरोप ED ने केला आहे.
  • 2003 ते 2005 या कालावधीत हा व्यवहार झाला होता. या जमीनीच्या मुळ मालकिणीला जमीन विकण्यासाठी धमकावल्याचा आणि या व्यवहारातील रक्कम दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप ED ने आरोपपत्रात केला आहे.
  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या हस्तकाचा उल्लेख NIA ने FIR मध्ये केला आहे. त्या व्यवहाराची चौकशी केली असता त्यामध्येही नवाब मलिक यांचा एक व्यवहार उघड झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यानुसार ईडीने तक्रार दाखल केली होती.
  • मंत्री नवाब मलिक यांनी मुनिरा प्लंबर यांच्या जमीनीचा व्यवहार अशाच प्रकारे केला होता, असा आरोपही ईडीने केला आहे.
  • मलिक यांच्या मे, सोलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्या मलिक यांच्या कुटूंबियांमार्फत चालवल्या जात आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या कुटूंबियांचे नाव या आरोपपत्रात दाखल केले आहे.
  • नवाब मलिक यांना दोन्ही कंपन्यांमधून मासिक 11 कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

या सर्व मुद्द्यांचा समावेश करत ED ने नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र PMLA कोर्टात दाखल केले आहे. तर आतापर्यंत महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर आरोपपत्र दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Tags:    

Similar News