नागपूर शहरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप १८ सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत १२ देशातील ५६० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. भारतातील ३४७ खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, आणि मिश्र दुहेरी अशा सर्व प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. नागपुरातील आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड, रितिका ठक्कर, अनन्या दुरुगकर, हृदय देशमुख, श्रुती चोखांद्रे, अजिंक्य पाथरकर, सिमरन सिंघी, अक्षय शेट्टी यांचाही यामध्ये असणार आहे, अशी माहिती आयोजक अरुण लखानी यांनी दिली आहे.