चालत्या अॅम्ब्युलन्सला आग,वाहन चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला....
चालत्या अॅम्ब्युलन्सला आग,वाहन चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला.... fire in ambulance in amravati city;
सध्या कोरोना रुग्णांची सेवा करताना अॅम्ब्युलन्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. डॉक्टरांप्रमाणेच अॅम्ब्युलन्स देखील देवदूत ठरत आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यात याच अॅम्ब्युलन्सला आग लागली.
लेहगाव वरून अमरावती ला रुग्ण घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सने अचानक पेट घेतला. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळल्याची घटना टळली. आज सकाळी अमरावती येथे पंचवटी चौकात ही घटना घडली.
लेहगाव येथून अमोल तट्टे या रुग्णाला घेऊन एम एच- 40 AT- 0427 क्रमांकाची ॲम्बुलन्स अमरावती साठी निघाली होती अमरावती येथे पंचवटी चौकात पोहोचताच वाहन चालक विक्की तंतरपाळे यांना ॲम्बुलन्स मध्ये वास आल्याने अॅम्ब्युलन्स थांबवली व लगेच रुग्णाला रुग्णवाहिकेतून बाहेर काढले.