गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पैलवानांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत कुस्तीपटूंच्या दुसऱ्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, या बैठकीत चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीची नावे आज जाहीर होणार आहेत.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची समिती ४ आठवड्यांत चौकशी पूर्ण करेल, असे ते म्हणाले. यासोबतच WFI च्या दैनंदिन कामकाजावरही समिती लक्ष ठेवणार आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह हे महासंघाचे काम पाहणार नाहीत. मात्र, तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, 'केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि योग्य तपासाचे आश्वासन दिले. मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला आशा आहे की निष्पक्ष चौकशी होईल, म्हणून आम्ही धरणे मागे घेत आहोत.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) बैठकीत WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयओएने कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन केली. त्यात बॉक्सर मेरी कोम, तिरंदाज डोला बॅनर्जी, बॅडमिंटनपटू अलकनंदा अशोक, फ्रीस्टाइल कुस्तीपटू योगेश्वर दत्त, भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश आहे.
कुस्तीपटूंनी आयओएला (IOA) लिहिले पत्र
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (IOA) लिहिलेल्या पत्रात कुस्तीपटूंनी त्यांच्या संपूर्ण वेदना व्यक्त केल्या आहेत. कुस्तीपटूंचा आरोप- टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे पदक हुकले होते, तेव्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी तिला इतके मानसिक त्रास दिला की, विनेशने आत्महत्या करण्याचा निर्णया पर्यंत पोहोचली होती असं या पात्रात म्हंटल आहे. इकडे तिसऱ्या दिवसाच्या संपानंतर खेळाडू क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या घरी पोहोचले आहेत. कालही खेळाडू आणि ठाकूर यांच्यात दोन तास चर्चा झाली होती.
ब्रिजभूषण शरण सिंग यांनी क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांची शुक्रवारची पत्रकार परिषद रद्द केली आहे. ब्रिजभूषण यांचा मुलगा प्रतीकने मीडियाला सांगितले - 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) वार्षिक बैठकीनंतर ब्रिज भूषण मीडियाशी बोलणार आहेत. ब्रिजभूषण शरण यांनी त्यांचे उत्तर क्रीडा मंत्रालयाला पाठवले आहे.