Maxmaharashtra impact : अखेर....'मॅक्समहाराष्ट्र'च्या दणक्याने 'त्या' बलात्कारी नराधामला 21 दिवसानंतर अटक

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तर त्यामध्ये आरोपी 21 दिवस मोकाट होता.;

Update: 2022-03-16 01:59 GMT

जव्हार मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच जव्हार मधील एका विवाहित महिलेवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार केल्याची घटनेने वाढलेल्या संतापाची वृत्त Max Maharashtra ने प्रसिध्द केल्यानंतर पालघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ४८ तासांच्या आत सादर करण्याचा आदेश राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते . मॅक्समहाराष्ट्राच्या दणक्या नंतर झोपी गेलेल्या जव्हार पोलिसांनी चांगलीच भंबेरी उडाली होती यानंतर आरोपीची शोध मोहिम सुरू होती हा आरोपी आपल्या नातेवाईकडे खंबाळया जवळ एका झोपडित वास्तव्य करत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी सापळा रचून 15 तारखेला दुपारी अटक केली

घटना नेमकी काय ..?

ही घटना जव्हारपासून काही अंतरावर असलेल्या कुंडाचा पाडा येथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित महिला घराच्या लगत असलेला हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री 11 च्या सुमारास घरी परतत होती. यावेळी आरोपीने या महिलेला रस्त्यात अडवले आणि जबरदस्तीने तोंडात रुमाल कोंबून पडक्या घरात खेचत नेले. तिथेच तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते.




 


Max Maharashtra ने यासंबधीचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेने पालघलर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण यानंतर घाबरलेल्या त्या महिलेने सुरवातीला आपल्या पतीला काही सांगितले नाही. पण दोन दिवसांनी तिने पतीला खरी हकीकत सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला होता. या प्रकारानंतर 3 तारखेला रात्री 10 वाजता पीडित महिलेसह तिचे कुटूंब तक्रार देण्यासाठी जव्हार पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. यानंतर त्यांनी जव्हारच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर 24 तारखेला जव्हार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु 21 दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपी मोकाट होता. परंतु अखेर मॅक्समहाराष्ट्राच्या दणक्याने या बलात्कारी आरोप्याच्या मूसक्या आवळल्या गेल्या आहेत.

पोलीस निरीक्षक लेंगरे यांची उचलबांगडी करा

दिवसेंदिवस जव्हार मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे खतपाणी घालत आहेत हे जव्हार मध्ये घडलेल्या अनेक घटनांवरून अधोरेखित झाले आहे यामुळे एका मागे एक घडलेल्या बलात्काराच्या संवेदनशील घटनांमध्ये लेंगरे यांनी आपल्या कर्तव्यात मोठा कसूर केला आहे यामुळे पोलीस निरीक्षक लेंगरे यांची उचलबांगडी करून कठोर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आम्ही गृहराज्य मंत्र्यांना पत्रव्यवहार केला असून कडक पाठपुरावा करणार असल्याचे

काँग्रेसचे जिल्हा सचिव अंनता वणगा यांनी मॅक्स-महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

मुळ बातमी:

Max Maharashtra Impact: विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी महीला आयोगाचे कारवाईचे आदेश | #MaxMaharashtra


Tags:    

Similar News