अखेर मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघारमागील चौदा महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करतायत मागील लोकसभेला जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याची भूमिका घेतलेली होती मात्र या विधानसभेमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होते.या विधानसभा निवडनुकीत आपले उमेदवार देणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केलं होतं या दरम्यान महाराष्ट्रभरामधून अनेक इच्छुक उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती देखील घेतलेल्या होत्या त्यानंतर मुस्लिम व दलित जातीय समीकरण मिळतंय का हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी बैठका घेऊन पाहिलेले होतं तर या दरम्यान काल रात्री देखील पत्रकार परिषदेत घेत मनोज जरांगे प्रचंड भावूक झालेले होते.
यावेळी त्यांनी आपण कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार उतरवणार याबाबत माहिती दिली होती तसेच लवकरच उमेदवारांची घोषणा करु, असं देखील जरांगे यांनी सांगितल होत.मात्र रात्री तीन वाजेपर्यंत मराठा समाज उमेदवार यांची बैठक घेतल्यानंतर सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रभरातील मराठा उमेदवारांना अर्थातच ज्यांनी ज्यांनी मनोज जरांगे यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज माघार घेण्यास सांगितले आहे.तर एका जातीने ही लढाई जिंकणं शक्य नसून त्यामुळे ही निवडणूक आपल्याला लढता येणार नाही असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलय तर या दरम्यान मित्र पक्षांची यादी न अल्याने माघार घेतल्याचे देखील जरांगे यांनी यावेळी सांगितलंय तर ज्याला पाडायचे त्याला पाडा, आणि ज्याला आणायचे त्याला आणा अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केलीय.या निवडणुकी दरम्यान कोणाच्या प्रचाराला जायचं नाही तर जो उमेदवार आपल्या मागण्यासाठी व्हिडीओग्राफी करेल त्याला आपण पाठींबा देखील देणार असल्याचे त्यांनी जाहिर केलंय त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर या निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने कोणाला फटका बसेल व कोणाला फायदा होईल हे येत्या काही दिवसातच समजणार आहे.