तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या संदर्भात गंभीर आरोप करत आत्महत्या करू या आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पारनेरच्या बदली झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवरे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, वाळू तस्करीच्या कारवाईबाबतीत अनियमतता समोर आल्याचे या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. एकंदरीत याबद्दल असलेले पुरावे या आधारे तक्राररदार माजी सैनिक कारभारी पोटघन यांनी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना वकील असीम सरोदे यांनी चौकशीची मागणी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान देवरे यांच्या ऑडीओ बद्दल पत्रकारांनी विचारले असता देवरे यांनी भावनिकतेचा मुद्दा पुढे करू नये असा सल्ला त्यांनी दिला.सोबतच काम करत असताना एखाद्या महिला अधिकाऱ्यांनी त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर मी त्यांच्या पाठीशी एक वकील म्हणून उभा राहील असं त्यांनी म्हटले आहे.