मोठी बातमी : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ(AIFF)निलंबित

भारतीय फुटबॉल महासंघावर थर्ड पार्टीचा प्रभाव असल्याचं दिलं कारण, देशात होणारा महिला विश्वचषक स्थगित

Update: 2022-08-16 04:52 GMT

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) निलंबित केलं आहे. AIFF वर तिसऱ्या पक्षाचा "अवाजवी प्रभाव" असल्याचं कारण FIFA ने दिलं आहे. जी FIFA च्या नियमांची पायमल्ली आहे असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

"फिफा परिषदेच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला  तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावामुळे तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, जे फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे," FIFA ने एका निवेदनात म्हटले आहे.

AIFF कार्यकारी समितीचे अधिकार रद्द झाल्यानंतर आणि AIFF प्रशासनाचे दैनंदिन कामकाजावर पूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल, असं आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशासकीय मंडळाने म्हटले आहे. या निलंबनामुळे भारतात 11-30 ऑक्टोबर 2022 रोजी होणारा FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 स्थगित झाला आहे.

FIFA ने सांगितले की ते स्पर्धेच्या संदर्भात पुढील टप्प्यांचं मूल्यांकन करत आहे आणि आवश्यक असल्यास ते हे प्रकरण परिषदेच्या ब्युरोकडे पाठवतील. नियामक मंडळाने ते भारतातील युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाशी संपर्कात आहेत आणि त्यांना या प्रकरणात सकारात्मक निकाल मिळू शकेल अशी आशा आहे.

बायचुंग भुतीया ने व्यक्त केली खंत

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया यानेदेखील या बातमीवर खंत व्यक्त केली आहे. एका व्हिडीओमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. FIFA ने AIFF चं केलेलं निलंबित हे खूप दुर्दैवी आहे. हा एक कठोर निर्णय आहे. त्याचबरोबर आपल्या देशात योग्य यंत्रणा बनवण्याची वेळ आली आहे असे म्हणू इच्छितो. यासाठी सरकार, क्लब सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन देखील त्याने केलं आहे. बायचुंग चा हा व्हिडीओ पत्रकार कमालिका सेन गुप्ता यांनी ट्विट केला आहे.

Tags:    

Similar News