अखेर महिला फुटबॉल विश्वचषक भारतातच होणार, FIFA कडून भारतावरचं निलंबन मागे

FIFA ने AIFF वर घातलेली बंदी उठवल्याने फुटबॉल विश्वचषक भारतातच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Update: 2022-08-27 02:41 GMT

गेल्या काही दिवसांपुर्वी FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली होती. त्यामुळे फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद असलेल्या भारताला मोठा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर अखेर फिफाने भारतावर टाकलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

फिफाने 25 ऑगस्टपासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरचे (AIFF) निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाखालील महिला विश्वचषक (U-17 Woman world Cup) नियोजित केल्याप्रमाणे भारतातच आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.


फिफाने का घातली होती बंदी?

तिसऱ्या पक्षाच्या अयोग्य हस्तक्षेपामुळे फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले होते. त्यामुळे भारत आयोजक असलेल्या १७ वर्षाखालील महिला विश्वचषकाच्या आयोजनावरही संकट आले होते.

मात्र फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावरची बंदी उठवल्यामुळे हा फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाचा क्षण मानला जात आहे. तर 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान भारतात महिला विश्वचषक सामन्यांचा थरार फुटबॉल प्रेमींना अनुभवता येणार आहे.

Tags:    

Similar News