अमरावती एमआयडीसी मध्ये भीषण अग्नितांडव
अमरावती बडनेरा रोडवरील असलेल्या औद्योगिक वसाहतमधील नॅशनल केमिकल पेस्टिसाईड कंपनीला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे.;
अमरावती :अमरावती बडनेरा रोडवरील असलेल्या औद्योगिक वसाहतमधील नॅशनल केमिकल पेस्टिसाईड कंपनीला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे.या आगीचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान या कंपनीमध्ये झाले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे मध्यरात्रीपासूनच प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे 50 ते 55 बंब घटनास्थळी दाखल झाले असून , जिल्हाभरातील अग्निशामक यंत्रणा कामाला लागली आहे.
दरम्यान घटनास्थळी आगीने प्रचंड हात पसरले असून , अग्निशमन दलासह पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे, जीव धोक्यात घालून अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेल नाही.